शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोंढवा येथील उद्यानात बॉम्ब आढळल्याने खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 20:29 IST

बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उंड्री - एनआयबीएम रस्त्यावरच्या कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना झाडावर ठेवलेला हा बॉम्ब दिसला.

ठळक मुद्देजमिनीपासून आठ फूट झाडावर ठेवला बॉम्ब. नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

कोंढवा: कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकसित होत असलेल्या या उद्यानाजवळ मोठमोठ्या सोसायट्या असल्याने या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंड्री - एनआयबीएम रस्त्यावर कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात ही घटना घडली आहे. उभा सोसायटीच्या अमेनिटी स्पेसवर पालिकेतर्फे नवीन उद्यान विकसित केले जात आहे. या ठिकाणी त्याबाबतचे ठिकठिकाणी माती टाकण्याचे काम काही कामगार नेहमी प्रमाणे करीत होते. बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना हा बॉम्ब झाडावर ठेवलेला दिसला. त्यांच्या मुलांनी ही घटना घरी गेल्यावर त्यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु,जेव्हा मुलांनी त्यांना त्यावर वस्तूवर काहीतरी लिहले आहे,असे सांगितले .त्यांनी नगरसेविका नंदा लोणकर यांना याबाबत कल्पना दिली. लोणकर यांनी याबाबत कोंढवा पोलिसांना कळविले. कोंढवा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले व त्यांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला. उद्यान व परिसरात अजून काही बॉम्ब आहेत की नाही याची खात्री बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने केली. परंतु,त्यांना काही आढळले नाही. हा जिवंत बॉम्ब असल्याचे कळत आहे, त्याची संहारक क्षमता बरीच असल्याने नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे. पालिकेच्या उद्यानात सुरक्षारक्षक उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. हा बॉम्ब याठिकाणी कसा आला, जमिनीपासून जवळपास आठ फूट उंचीवर झाडावर हा बॉम्ब कोणी का ठेवला, त्याने तो येथे ठेवण्याचे कारण काय होते, याबाबत तपास कोंढवा पोलिस करीत आहेत. या बॉम्बवर लिहलेल्या सांकेतिक क्रमांकावरून त्याचा ठावठिकाणा काढण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. उद्यानाच्या आजूबाजूला मोठ्या रहिवाशी गृहरचना सोसायट्या असल्याने अशा ठिकाणी बॉम्ब आढळल्याने परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसKondhvaकोंढवा