लावणीच्या रंगात बॉलिवूडतारका
By Admin | Updated: October 31, 2015 01:06 IST2015-10-31T01:06:18+5:302015-10-31T01:06:18+5:30
लावणीचा ठसका असल्याशिवाय मराठी फिल्म अॅवॉर्डचा सोहळाच अपूर्ण. हा ठसका हॉट सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर आपल्या अदांसह दाखवित असल्यावर

लावणीच्या रंगात बॉलिवूडतारका
नॉर्वेजियन क्रूझ (स्पेन) : लावणीचा ठसका असल्याशिवाय मराठी फिल्म अॅवॉर्डचा सोहळाच अपूर्ण. हा ठसका हॉट सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर आपल्या अदांसह दाखवित असल्यावर, तर ‘सोने पे सुहागा’. स्पेनमधील नॉर्वेजियन क्रूझवर ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अॅवॉर्ड्स’ सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण बॉलिवूडच्या तारकांच्या मराठमोळ्या अदा आहे. क्रूझवर रंगण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
स्पेनच्या समुद्रातील नॉर्वेजियन क्रूझवर कलर्स प्रस्तुत इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अॅवॉर्डस (इम्फा) सोहळा रंगत आहे. आज रात्रीपासून त्याला आणखी रंग चढत जाईल; पण आजचा संपूर्ण दिवस सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर यांनी गाजविला. सोहळ्यामध्ये होणाऱ्या लावणी परफॉर्मन्ससाठी त्यांची रिहर्सल सुरू आहे. बॉलिवूडच्या तारका परफॉर्मन्सबाबत किती काळजी घेतात, हे पाहून मराठी कलाकारांनीही आश्चर्य व्यक्त केले.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची कन्या तानिशा मुखर्जीही इम्फाच्या मंचावरून प्रथमच मराठी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तानिशाने आपल्या परफॉर्मन्सबाबत अत्यंत गुप्तता पाळली आहे. ऊर्मिला मातोंडकरही क्रूझवर उपस्थित असून, रिहर्सलमध्ये मग्न आहे. मराठी कलाकारांचा तर याठिकाणी अक्षरश: कल्ला चालला आहे. एखाद्या पिकनिकसारखा हा सोहळा एन्जॉय करत आहेत. मित्रांबरोबर गप्पाष्टके रंगत आहेत. सोहळ्यातील परफॉर्मन्सबाबत चर्चा घडत असून, त्यामध्ये गप्पांतून इंप्रुवायझेशनही होत आहे. ज्येष्ठ कलाकारांकडून मार्गदर्शन
मिळत आहे.