बोगस डॉक्टरांना नाही कायद्याचा धाक

By Admin | Updated: July 15, 2015 02:26 IST2015-07-15T01:51:47+5:302015-07-15T02:26:46+5:30

मॉडर्न अ‍ॅलोपॅथीचे वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे उघड झाले आहे

The bogus doctor does not have any legal dilemma | बोगस डॉक्टरांना नाही कायद्याचा धाक

बोगस डॉक्टरांना नाही कायद्याचा धाक

पुणे : मॉडर्न अ‍ॅलोपॅथीचे वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे उघड झाले आहे. डॉक्टर नसतानाही रुग्णांवर अ‍ॅलोपॅथीचे उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला नोव्हेंबर २०१४मध्ये पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही संबंधित बोगस डॉक्टरने पुन्हा दुसऱ्या ठिकाणी उपचाराचे दुकान थाटले आणि रुग्णांना कोणतीही औषधे देऊन त्यांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे. यावरून बोगस डॉक्टरांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. एकदा गुन्हा दाखल होऊनही पुन्हा प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरला पुणे महापालिकेने पकडले आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसतानाही डॉक्टर म्हणून उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुणे महापालिकेने सागर अशोक सुपेकर हा बनावट डॉक्टर मंगळवारी पकडला. त्यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपेकर यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीचे शिक्षण घेतले आहे. हे शिक्षण घेतलेल्यांना डॉक्टर लावता येत नाही आणि अ‍ॅलोपॅथीचीही प्रॅक्टिस करता येत नाही. असे असतानाही सुपेकर ते करीत असल्याचे दिसून आले होते. म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ५ नोव्हेंबर २०१४ रोजी बाणेर रस्त्यावरील सुपेकर यांच्या विमल पॉलिक्लिनिकवर धाड टाकली होती. गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यांच्यावर न्यायालयात खटलाही चालू आहे. सुपेकर यांचे जुनी वडारवाडीमध्येही एक क्लिनिक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुपेकर क्लिनिक चालवीत होते. आरोग्य विभागाने सोमवारी रात्री त्यांच्या क्लिनिकवर धाड टाकली. दहा बाय दहाच्या खोलीमध्ये थाटलेल्या या क्लिनिकमध्ये झोपडपट्टीतील अशिक्षित, मजूर रुग्ण उपचार घेण्यासाठी थांबल्याचे पाहून आरोग्य विभागाचे अधिकारीच चक्रावले. त्याचा पंचानामा करून अधिकाऱ्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला. बोगस डॉक्टरकडून दिली जात होती जीवघेणी औषधे महापालिकेने पकडलेल्या सुपेकर या बोगस डॉक्टरकडून रुग्णांच्या जिवावर बेतू शकणारी औषधे दिली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. स्टेरॉईड असलेले डेक्फान, अ‍ॅलर्जी थांबविण्यासाठी दिले जाणारे एव्हील, दुखणे थांबविण्यासाठी डायक्लोफॅनॅक सोडियम, अ‍ॅसिडिटी थांबविण्यासाठी रॅनीटेडिन ही इंजेक्शन सुपेकर रुग्णांना सर्रासपणे देत होते. याहूनही गंभीर म्हणजे, साधा ताप आलेल्या रुग्णांना टॅक्सीम नावाचे औषध सुपेकर लिहून देत होते. जे औषध टायफाईड झालेल्या रुग्णांना दिले जाते. सामान्य ताप आलेल्या रुग्णांनी हे औषध घेतले, तर त्याच्या शरीरामध्ये ‘ड्रग रेजिस्टन्स’ निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. संघटनेकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुपेकर यांना मॉडर्न अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी नसतानाही ती केली जात असल्याचे महापालिकेने उघड केल्यानंतरही संबंधित डॉक्टराविरोधात पालिकेबरोबर उभे राहण्याऐवजी इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात होते. यावरून संघटनाच त्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्यांदाच एक बोगस डॉक्टर दुसऱ्यांदा पकडला महापालिकेने बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम उघडली आहे आणि त्याअंतर्गत शहरात बोगस डॉक्टरांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत शहरात २० बोगस डॉक्टरांना पालिकेने पकडले आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर न्यायालयात खटले सुरू आहेत. मात्र, त्यांपैकी अनेक बोगस डॉक्टरांनी दुसरीकडे पुन्हा दुकाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू केलेला आहे. महापालिकेने पहिल्यांदाच अगोदर गुन्हा दाखल होऊनही पुन्हा क्लिनिक उघडणाऱ्या बोगस डॉक्टराला पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पालिकेने पकडलेले बोगस डॉक्टर वर्षबोगस डॉक्टर २०१३३ २०१४११ २०१५६

Web Title: The bogus doctor does not have any legal dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.