शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:53 AM

पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला सुगावा लागल्याने तो फरार झाला.

लोणी काळभोर  - पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला सुगावा लागल्याने तो फरार झाला.कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील इंदिरा नगर कडे जाणा-या एका इमारतीत गेली १० ते १५ वर्षे पासून सदर इसम दवाखाना थाटून मुळव्याध, भगंदर, फिशर आदी रोगांवर आयुवेर्दीक पद्धतीने उपचार व शस्त्रक्रिया करत होता. सदर रोग सांगण्यासारखे नसल्याने उपचारानंतर त्रास झाला तरी याची चर्चा होत नव्हती. त्यांमुळे या डॉक्टरांचा फावले होते. सदर बाब काहींना समजली त्यांमुळे स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जाधव यांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज सकाळी कदमवाकवस्ती वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी कारवाई कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले यामध्ये साहय्यक वैद्यकीय अधिकारी घाटे, पोलीस व स्थानिकही होते. दवाखाना तपासणी करण्यासाठी पथक येत आहे. याचा सुगावा लागताच तो दवाखाना बंद करून फरार झाला. वैद्यकीय अधिका-यांनी या बोगस डॉक्टरच्या पदवी प्रमाण पात्राच्या सत्यप्रतीची मागणी त्याच्या कुटुंबियांकडे केली असून तपासणी नंतर जर पदवी बोगस असेल तर या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.लैैंगिक समस्यांच्या जाहिराती करुन बोगस डॉक्टर रुग्णांची अडवणूक करुन त्यांच्याकडून पैैसे उकळत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची मान्यता नसलेली औषधे देऊन फसवणूक केली जात असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :docterडॉक्टरCrimeगुन्हाPuneपुणे