शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडालेल्या तरुणांचा मृतदेह ३८ तासांनंतर हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 16:44 IST

Pune News : सौरभ आणि ओंकार हे सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. पण सेल्फी काढताना तोल जाऊन ते पाण्यात पडले व वाहून गेले. 

पुणे - बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात सेल्फी काढताना शुक्रवारी नदीत पडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर हाती लागले. ओंकार तुपधर (वय १८) आणि सौरभ कांबळे (वय २०, दोघेही रा. ताडीवाला रोड) अशी या तरुणांची नावे आहेत. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. तसेच शहरात पडलेल्या पावसामुळे नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली होती. पाण्याला ओढही होती.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ आणि ओंकार हे सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. पण सेल्फी काढताना तोल जाऊन ते पाण्यात पडले व वाहून गेले. अग्निशमन दलाने तातडीने शोध कार्य सुरु केले. परंतु, रात्र झाल्याने दोघांचा पत्ता लागू शकला नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दलाकडून शनिवारी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. संगम पुलापर्यंत सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु, दोघांचा तपास लागू शकला नाही. ताडीवाला रोड येथील तरुणही त्यांचा शोध घेण्यासाठी मदत करीत होते. रात्र झाल्याने शनिवारी शोधकार्य थांबविण्यात आले होते.

रविवारी सकाळी ८ वाजता शोध कार्य सुरू करीत असताना महापालिकेसमोरील टिळक पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. बाहेर काढल्यावर तो ओंकार तुपधर याचा असल्याचे आढळून आले. त्याचसुमारास संगम पुलाजवळ फिरत असणारे त्रिकोने यांना पुलाजवळील लोखंडी जाळीजवळ एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. सौरभ कांबळे याचा मृतदेह बाहेर काढला. पाण्यात बुडाल्यानंतर तब्बल ३८ तासानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू