कुरंगवडीत युवतीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:27+5:302021-07-14T04:14:27+5:30
राजगड पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक प्रमोद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली बालाजी श्रीगिरे (वय २१, मूळ रा. कोळपा, ता. ...

कुरंगवडीत युवतीचा मृतदेह आढळला
राजगड पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक प्रमोद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली बालाजी श्रीगिरे (वय २१, मूळ रा. कोळपा, ता. जि. लातूर) असे विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या युवतीचे नाव आहे. भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावच्या हद्दीत ही घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामचंद्र मारुती गोरे यांनी राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक उपनिरीक्षक प्रमोद भोसले, पोलीस नाईक युवराज घोंडे यांनी भेट दिली. दहा जुलैला दीपाली बेपत्ता झाली होती. दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला रविवारी कुरुंगवडीच्या विजय शिळीमकर यांच्या शेतातील विहिरीत दीपालीचा मृतदेह आढळून आला.