शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुळा-मुठा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:53 IST

पुना हॉस्पीटल भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह हात पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

ठळक मुद्देशरीरावर वार असल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता

पुणे : मुळा-मुठा नदीपात्रातील पुना हॉस्पीटल भागात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना समोर आली असून मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नदीपात्रात टाकून दिल्याचे दिसून येत आहे. महिलेचे वय ३० ते ३५ वर्ष असून तिच्या शरीरावर वार करण्यात आले होते. महिलेचा मृतदेह कुजलेला असल्याने तो काही दिवसांपुर्वीच नदीत टाकण्यात आला असावा. त्यामुळे तिची ओळख पटविणे अवघड जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानांनी स्थानिक जीवरक्षक राजेश काची, संजय जाधव यांनी त्यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. महिलेचे हात पाय मागील बाजूस बांधलेले असलेल्या अवस्थेत मृतदेह पोत्यामध्ये आढळून आला. दरम्यान, नदीपात्रात मृतदेह आढळल्याचे समजताच घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती.      महिलेने नीळसर कुर्ता आणि चॉकलेटी रंगाची लेगिन परिधान केलेली आहे. हातात घड्याळ तसेच पायात सँडलही आहेत. तीच्या डाव्या हातावर संजय असे मराठीत गोंदलेले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी पोलिसांनी दिली. .........................मारेकऱ्यांच्या शोधासाठी तीन पथके रवानामयत महिलेची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग महिला युवतींची माहिती पडताळून पाहिली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत. अजय कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस स्टेशन 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाMurderखूनWomenमहिलाCrimeगुन्हाPoliceपोलिस