मुखई नदीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह

By Admin | Updated: October 6, 2016 03:40 IST2016-10-06T03:40:47+5:302016-10-06T03:40:47+5:30

मुखई येथील वेळनदीच्या पात्रात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

The body of the student found in the main river | मुखई नदीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह

मुखई नदीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह


शिक्रापूर : मुखई येथील वेळनदीच्या पात्रात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
सिद्धेश नथू गायकवाड (वय १७, रा. खोडद, ता. जुन्नर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेश मुखई येथील शाळेत शिकत होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार ३ आॅक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली होती. यानंतर त्याचा मृतदेह मुखई येथील वेळ नदीच्या पात्रात अडकलेला आढळून आला. येथील मुख्याध्यापक शिरसाट यांनी सांगितले, की सिद्धेश मुखई येथील काळभैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अकरावी शास्त्र शाखेत शिकत होता. तो येथील पार्वतीबाई या वसतिगृहात राहत होता. सोबतच्या विद्यार्थ्यांकडून तो पोहायला गेला असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहकाऱ्यांसोबत हा मुलगा पोहण्यास गेला होता. तो पोहताना बुडाला. परंतु घाबरलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

Web Title: The body of the student found in the main river