शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट' झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 21:58 IST

घरातील चाकू घेऊन ‘मी एकेकाला मारून टाकतो, नाहीतर मीच मरतो’ असे म्हणून चंदन सैरावैरा धावू लागला...

चाकण : अचानक वेड्यासारखा बडबड करून शिवीगाळ करून हातातील चाकूने खोलीतील मित्रांना दमदाटी करून सैरभैर झालेल्या तरुणाचा नाणेकरवाडीच्या हद्दीत मृतदेह आढळला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन शिशिर बेहरा ( वय २२, सध्या रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मुळगाव नेताजीनगर, थाना तमलूग, जिल्हा पूर्व मिनापूर, पश्चिम बंगाल ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. काल सकाळी साडेसातच्या सुमारास हा मृतदेह चाकण-तळेगाव रोडवर नाणेकरवाडीच्या हद्दीत आराधना स्वीट समोर मिळून आला. याबाबतची फिर्याद सैकत पंकज दास ( वय २४, रा. वसंत भागुजी गवते यांची चाळ, बालाजीनगर, भाग्यांजली बिल्डिंगच्या मागे, मेदनकरवाडी, चाकण ) यांनी दिली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार दि. ५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चंदन हा कामावर जाण्यासाठी तयार होत असताना अचानक आरडा ओरडा करून रूममधील मित्रांना शिवीगाळ व असंबंध बडबड करू लागला. घरातील चाकू घेऊन ‘मी एकेकाला मारून टाकतो, नाहीतर मीच मरतो’ असे म्हणून सैरावैरा धावू लागला. म्हणून त्याच्या मित्रांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. थोड्यावेळात पोलीस आले पण अंधारामुळे चंदन पळून गेला.  सकाळपर्यंत शोध घेतला असता तो मिळाला नाही. दिनांक ६ मार्च रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास चंदनचा मृतदेह तळेगाव रोडवरील आराधना स्विटसमोर मिळून आला. त्याच्या अंगावर जखमा दिसून येत असल्याने हा अपघात आहे की घातपात की आत्महत्या आहे हे अद्याप समजलेले नाही. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार हे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे