बेपत्ता तरुणीचा मृतदेह हडपसरमध्ये रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST2021-09-23T04:13:44+5:302021-09-23T04:13:44+5:30

पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हडपसर येथील रेल्वे रुळावर आढळून आला आहे. प्रतिमा भास्कर ...

The body of a missing girl was found on a railway track in Hadapsar | बेपत्ता तरुणीचा मृतदेह हडपसरमध्ये रेल्वे रुळावर

बेपत्ता तरुणीचा मृतदेह हडपसरमध्ये रेल्वे रुळावर

पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह हडपसर येथील रेल्वे रुळावर आढळून आला आहे.

प्रतिमा भास्कर कुटगे (वय २२, रा. आंबेडकरनगर), असे तरुणीचे नाव आहे. प्रतिमा कुटगे ही सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत वाट पाहूनदेखील ती घरी परतली नाही. नातेवाइकांनी इतर ठिकाणी चौकशी केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. शेवटी नातेवाइकांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा धाव घेत प्रतिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस तिचा शोध घेत होते; परंतु संबंधित वर्णनाची एक तरुणी हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतावस्थेत मिळून आली. त्यांनी याची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना दिली होती. खात्री केली असता ती तरुणी प्रतिमा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला. अधिक चौकशीसाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. प्रतिमा घरातून गेल्यानंतर ती रेल्वे रुळापर्यंत कशी पोहोचली, तिच्यासोबत कोणी होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a missing girl was found on a railway track in Hadapsar