विवाहितेचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: May 27, 2014 07:14 IST2014-05-27T07:14:55+5:302014-05-27T07:14:55+5:30

येथील रेखा लॉरेन्स फर्नांडीस (वय ३३) या विवाहितेचा मृतदेह नसरापूर येथील चंदन ओढ्यावरील पुलाखाली आढळून आला.

The body of a married man was found | विवाहितेचा मृतदेह आढळला

विवाहितेचा मृतदेह आढळला

नसरापूर : येथील रेखा लॉरेन्स फर्नांडीस (वय ३३) या विवाहितेचा मृतदेह नसरापूर येथील चंदन ओढ्यावरील पुलाखाली आढळून आला. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नसरापूर येथील राजगड पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार नसरापूर येथील विवाहिता रेखा लॉरेन्स फर्नांडीस ही दि.२२ पासून वडिलांचे राहत्या घरातून नेहमीप्रमाणे न सांगता निघून गेली होती. रेखा घरातून न सांगता बाहेर गेल्यानंतर ती परत घरी येत असे. त्यामुळे याही वेळेस ती परत येईल असा घरच्यांचा समज होता. त्यामुळे अद्यापपर्यंत घरी न आल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली नव्हती. दि. २५ रोजी संध्याकाळी नसरापूर-कामथडीकच्या रोडवर चंदन ओढ्याच्या पुलालगत बाभळीच्या काटवनात रेखाचा मृतदेह पडल्याचे वडील स्टेफन अशोक रेणुकर (रा. नसरापूर) यांनी राजगड पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलीस घटनास्थळी गेले. पुढील तपास पोलीस हवालदार सुनिल जाधव करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The body of a married man was found