विवाहितेचा मृतदेह विहिरीत

By Admin | Updated: November 7, 2014 00:05 IST2014-11-07T00:05:38+5:302014-11-07T00:05:38+5:30

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

The body of the marriage is well in the well | विवाहितेचा मृतदेह विहिरीत

विवाहितेचा मृतदेह विहिरीत

रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यामुळे खळबळ उडाली
आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची खबर संतोष बापू चव्हाण (वय ३३) यांनी पोलिसांना दिली, तर स्वाती अशोक चौधरी (वय-२२, रा.निमगाव म्हाळुंगी) या घटनेत मयत झाल्या आहेत. बुधवारी दुपारी स्वाती बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. दरम्यान, जवळ असलेल्या नामदेव केरबा काळे यांच्या विहिरीजवळ तिच्या चपला दिसल्याने या घटनेची खबर तिचा भाऊ संतोष याने पोलिसांना कळविली. पोलीस घटनास्थळी आल्यावर स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील कार्यवाहीसाठी दाखल केले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघड होईल. (वार्ताहर)

Web Title: The body of the marriage is well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.