नेकलेस पॉर्इंटजवळ मृतदेह सापडला
By Admin | Updated: April 25, 2017 04:21 IST2017-04-25T04:21:35+5:302017-04-25T04:21:35+5:30
पाच दिवसांपूर्वी नीरा नदीत पडलेला तरुणाचा म्ृतदेह सोमवारी भोरनजीकच्या नेकलेस पॉर्इंटजवळील संगमनेर गावाच्या हद्दीलगत सोमवारी (दि. २४) दुपारी सापडला.

नेकलेस पॉर्इंटजवळ मृतदेह सापडला
नसरापूर : पाच दिवसांपूर्वी नीरा नदीत पडलेला तरुणाचा म्ृतदेह सोमवारी भोरनजीकच्या नेकलेस पॉर्इंटजवळील संगमनेर गावाच्या हद्दीलगत सोमवारी (दि. २४) दुपारी सापडला.
बालाजीनगर (पुणे) येथील संतोष रामचंद्र मधभावे (वय ३५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सतीश मधभावे यांनी याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या किकवी पोलीस चौकीत खबर दिली आहे. येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन बांदल व सहकाऱ्यांनी नीरा नदीच्या पात्रात पाण्यात तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला. (वार्ताहर)