बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: May 2, 2017 14:33 IST2017-05-02T14:33:31+5:302017-05-02T14:33:31+5:30
मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेलेला एक युवक सोमवारी बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेलेला एक युवक सोमवारी बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.
मोबीन पठाण (वय -22 वर्ष,रा. धायरी) असे मृत युवकाचे नाव आहे. कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त हा तरुण सोमवारी मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेला होता. मित्र पोहून बाहेर आले मात्र एक मित्र खूप वेळ बाहेर न आल्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटू लागली.
त्यांनी अग्निशामक दलाला माहिती कळविली असता दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी संध्याकाळी पहिल्या टप्प्यात खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरून युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र जवानांना तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी दलाचे जवान
पुन्हा पाण्यात उतरले आणि त्यांनी शर्थीने युवकाचा मृतदेह बाहेर काढला. युवकाचा मृतदेह हवेली पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची माहिती फायरमन प्रमोद मरळ यांनी दिली.
सिंहगड रोड फायर स्टेशन चे जवान तांडेल, मुजुमले, फायरमन प्रमोद मरळ,संतोष नलावडे, निलेश पोकले, विलास घडशी, ड्राइव्हर सातपुते या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले.