स्वच्छतागृहांसाठी 1क्क् ठिकाणी बोअरवेल्स

By Admin | Updated: June 29, 2014 22:49 IST2014-06-29T22:49:14+5:302014-06-29T22:49:14+5:30

धरणांमध्ये अवघ्या दीड महिन्याचा पाणीसाठा उरल्याने महापालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Boarvels at one place for the sanitaryhouses | स्वच्छतागृहांसाठी 1क्क् ठिकाणी बोअरवेल्स

स्वच्छतागृहांसाठी 1क्क् ठिकाणी बोअरवेल्स

>पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रणालीतील धरणांमध्ये अवघ्या दीड महिन्याचा पाणीसाठा उरल्याने महापालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत मोठय़ा आकाराच्या प्रमुख 1क्क् स्वच्छतागृहांच्या ठिकाणी बोअरवेल्स घेण्यासाठीचा प्रस्ताव घनकचरा विभागाने पाणीपुरवठा विभागास दिला आहे. शहरातील सुमारे 5क्क् ते 6क्क् स्वच्छतागृहांना पालिकेकडून पिण्याचे पाणीच वापरण्यात येत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे हे पाणी वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचे पत्र नुकतेच पाणीपुरवठा विभागास देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
शहरात पालिकेची सुमारे 55क् ते 6क्क् स्वच्छतागृहे आहेत. यातील अवघ्या 2क् ते 25 स्वच्छतागृहांना बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वर्षभरात तब्बल दोन ते अडीच टीएमसी पाणी लागते. हे सर्व पाणी पिण्याचे असते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. या वर्षी पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शहरात एक वेळ पाणी कपात सुरू असताना, स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यातच या ठिकाणी पाणीकपात करण्याचा प्रयत्न केल्यास ती मोठय़ा प्रमाणात अस्वच्छ होऊन घाणीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वाधिक वापर असलेल्या आणि मोठय़ा आकाराच्या स्वच्छतागृहांच्या ठिकाणी तत्काळ बोअरवेल्स घेण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी) 
 
गळक्या नळांचे काय ?
च्शहरात महापालिकेकडून नागरिकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहांची जवळपास सर्वच नळकोंडाळी गळकी आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. 
च्याबाबत मात्र प्रशासनाकडून काहीच हालचाल केली जात नाही. प्रत्यक्षात दर वर्षी अशा प्रकारे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना प्रशासनाकडून मात्र पाणी कपातीचे संकट उभे राहिल्यानंतरच त्याबाबत 
उपाययोजना केल्या जातात. 

Web Title: Boarvels at one place for the sanitaryhouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.