संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार

By Admin | Updated: May 18, 2015 23:10 IST2015-05-18T23:10:22+5:302015-05-18T23:10:22+5:30

बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीने बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यासाठी केंद्रीय सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

The Board of Directors complained about the dismissal | संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार

संचालक मंडळ बरखास्तीसाठी तक्रार करणार

बारामती : बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीने बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यासाठी केंद्रीय सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बारामती येथे सोमवारी (दि. १८) झालेल्या ठेवीदारांच्या बैठेकीत ठराव करण्यात आला.
बारामती येथे ठेवीदार संयुक्त समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी फलटण (जि. सातारा) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जागा विकत घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा नियमबाह्य विनियोग केल्या प्रकरणी संबंधितांच्या पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेच्या शाखा परस्पर बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये नव्याने फसवणूकीच्या पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात येणार आहे. यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ठाकरे म्हणाले, बीएचआर ठेवीच्या वसुलीसाठी हवेलीच्या प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर ९० दिवसांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत मिळतील. बारामती शहरातील ठेवीदारांच्या २४ कोटींच्या ठेवी आहेत. तर बारामती, भिगवण, फलटण परिसरातील ७०० ते ७५० ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत. ठेवी परत मिळविण्यासाठी कोणीही टक्केवारी देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
बारामती शहरातील ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ढमाळ म्हणाले, येत्या बुधवारी ठेवीदार एकत्र येऊन शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाब देणार आहेत. यावेळी दामोदर दाभाडे, राजकुमार महानुभव, सोपान सावंत, श्रेयश नलावडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: The Board of Directors complained about the dismissal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.