शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

पर्यावरणपूरक परिसराकडे बीएमसीसीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:32 IST

बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयाचा परिसर पर्यावरण पूरक करण्याचा महाविद्यालयाचा मानस असून महाविद्यालयात बायाेगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे.

पुणे :  बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) पर्यावरणपूरक परिसर हाेण्याकडे एक पाऊल टाकले अाहे. महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण हाेत असल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचा परिसर पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात अाला अाहे. याची सुरुवात म्हणून महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात बायाेगॅस प्रकल्प सुरु करण्यात अाला असून या प्रकल्पाचे उद्घाटन अाज उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. विजय नारखेडे अाणि डेक्कन एज्युकेशन साेसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी डेक्कन एज्युकेशन साेसायटी नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम, के.पी.अाय.टी ग्रुपचे चेअरमन रवि पंडित, महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ उपस्थित हाेते. बायाेगॅस प्रकल्प सुरु करणारे बीएमसीसी हे पहिले महाविद्यालय ठरले अाहे. 

    महाविद्यालयातील विविध प्रर्यावरणपूरक प्रकल्प ज्येष्ठ उद्याेजक नितीन देशपांडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत अाहेत. महाविद्यालयात सध्या प्रतिदिन 22.5 किलाे अन्न कचरा जिरवण्याची क्षमता असलेले बायाेगॅस यंत्र बसवले अाहे. त्यामुळे वसतीगृहातील उरलेलं अन्न, अाेला कचरा, झाडाचा पाेचाेळा यांचा वापर करुन मिथेन वायू निर्माण करण्यात येणार अाहे. त्यामुळे वर्षाचे 19 किलाेचे 22 सिलेंडर इतके इंधन निर्माण हाेणार अाहे. या यंत्रामध्ये 3000 लिटर क्षमतेचा डायजेस्टर व 3000 लिटर गॅस साठवणक करणारा फुगा वापरण्यात अाले अाहे. हे यंत्र वापरताना वीजेचाही वार करावा लागत नाही. त्याचबराेबर कचराही जसाच्या तसा बारीक न करता टाकला तरी चालताे. त्यातून जैविक खत निर्माण हाेणार असून त्याचा वापर महाविद्यालयाच्या बागेसाठी करता येणार अाहे. वायु असे या यंत्राचे नाव असून वाया नाही वायु हे याचे ब्रीदवाक्य अाहे. 

    याविषयी बाेलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रकांत रावळ म्हणाले, महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यानंतर महाविद्यालयातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर अाम्ही भर दिला. त्यातूनच महाविद्यालयातील क्लासरुम या डिजिटल करण्यात अाल्या अाहेत. त्याचबराेबर महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस करण्याचे बैठकीत ठरविण्यात अाले हाेते. त्याचेच पहिले पाऊल म्हणजे हा बायाेगॅस प्रकल्प अाहे. महाविद्यालयातील महिला वसतीगृहात सध्या वायु हे बायाेगॅस यंत्र बसविण्यात अाले अाहे. त्यामुळे माहविद्यालयातील 22.5 किलाे अन्न कचरा जिरवून त्यातून मिथेन वायू तयार करण्यात येणार अाहे. अाणि या वायूचा वापर करुन वर्षाला 19 किलाेचे 22 सिलेंडर इतके इंधन निर्माण हाेणार अाहे. त्यामुळे याचा महाविद्यालयाबराेबरच पर्यावरणालाही फायदा हाेणार अाहे. 

    महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पसबाबत अधिक माहिती देताना नितीन देशपांडे म्हणाले, महाविद्यालयात रेन वाॅटर हार्विस्टिंगद्वारे टेकडीवरुन येणारे पाणी साठविण्यात येईल. या माध्यमातून महाविद्यालयातील बाेअरवेल्स रिचार्ज करुन भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यावर भर देण्यात येणार अाहे. त्याचबराेबर महाविदयालयांच्या इमारतींवर साेलार पॅनलही बसविण्यात येणार अाहेत. अंघाेळीचे पाणी ज्यास पर्यावरणीय भाषेत ग्रे वाॅटर म्हणतात त्याच्यावर प्रक्रिया करुन ते फ्लशींगसाठी वापरण्यात येणार अाहे. या विविध प्रकल्पांच्या अाधारे महाविद्यालयाला वीज, गॅस, पाणी यांसाठी दर वर्षाला येणारे 51 लाखांचा खर्च खून्यावर अाणण्याचा प्रयत्न करण्यात येणार अाहे. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालयenvironmentवातावरण