शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस गार्डनच्या पार्किंगमध्ये मिलेशिया वृक्षावर ‘निळे मोती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:20 IST

एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये मिलेशिया म्हणजेच तुमा हा वृक्ष फुलला आहे...

- श्रीकिशन काळे

पुणे : वसंताची चाहूल लागली असून, सृष्टीने कात टाकायला सुरुवात केली आहे. शहरात पानगळ पाहायला मिळत आहे. नवीन पालवी उमलू लागली आहे. वृक्ष अंगावर नवतेचा शालू पांघरून डोलात बहरत असल्याचे दृश्य आजूबाजूला दिसत आहे. एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये मिलेशिया म्हणजेच तुमा हा वृक्ष फुलला आहे. त्यावर मधमाश्याही ताव मारत आहेत.

ऋतूंमध्ये वसंताला राजा मानला जातो. कारण या काळात सर्व सृष्टी फुलून गेलेली असते. जुनी पाने गळून नवीन पाने येत असतात. फुलांना बहर आलेला असतो. उन्हाचा पारा चढत असताना हा निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो. सध्या विविध वृक्षांना फुले यायला लागली आहेत. आता एकही पान नसलेले आणि केवळ फुलांनी लगडलेले मिलेशिया वृक्ष निळ्या रंगांच्या चिमुकल्या फुलांनी भरून गेले आहे. मिलेशिया हा विदेशी वृक्ष आहे. हा मूळचा ब्रह्मदेश (म्यानमार) आशियाई बेटातील रहिवासी वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ मिलेट यांच्या स्मरणार्थ प्रजातिनाम म्हणून या वृक्षाला हे नाव आहे. आपल्याकडे सुरुवातीला बंगालमध्ये हा आणला गेला. त्यामुळे त्याला बंगाली नाव आहे. ते म्हणजे तुमा. याचा अर्थ आहे मोत्यांसारखी किंवा रत्नांसारखी फुले गाळणारा. इंग्रजीतही ज्युवेल्स ऑन ए स्ट्रिंग असे नाव आहे. हा वृक्ष भारतात उद्यानवृक्ष म्हणून लावला जातो. करंज वृक्षाशी याचे बरेचसे साम्य पाहायला मिळते, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांच्या विदेशी वृक्ष या पुस्तकात नमूद आहे.

या फुलांचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये असतो. औंध परिसरात, स्पायसर कॉलेजमध्ये, एरंडवण्यात मिलेशियाची वृक्ष पाहायला मिळतात. हा वृक्ष नत्रस्थिरीकरण करतो. फुले लोंबणाऱ्या तुऱ्यांप्रमाणे येतात. पूर्ण बहरलेले झाड पाहायचे असेल तर एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये सध्या पाहता येत आहे.- डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पती संशोधकएम्प्रेस गार्डनमध्ये सध्या बरीच वृक्ष फुलायला लागली आहेत. त्यामध्ये मिलेशियाची वृक्ष चिमुकल्या निळसर फुलांनी लगडलेली आहेत. त्यावर मधमाश्याही मधासाठी येत आहेत.- प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक, एम्प्रेस गार्डन

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र