हिंजवडी रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

By Admin | Updated: May 13, 2017 04:42 IST2017-05-13T04:42:22+5:302017-05-13T04:42:22+5:30

डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील यशदाच्या मोकळ्या मैदानात २४ वर्षीय तरुणाचा हत्याराने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची

The bloodless murder of the youth on the Hinjewadi road | हिंजवडी रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

हिंजवडी रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील यशदाच्या मोकळ्या मैदानात २४ वर्षीय तरुणाचा हत्याराने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
श्रीनिवास महादेव पडवळे (वय २५, रा. साईनाथनगर थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील डांगे चौक हिंजवडी रस्त्यालगत यशदाची मोकळी जमीन आहे. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एका २४-२५ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर वार करून ओळख पटू नये म्हणून डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून निर्घृण खून केल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव हे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. श्रीनिवास हा थेरगावातील साईनाथनगरमध्ये बॅचलर राहायला होता. त्याचा खून प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Web Title: The bloodless murder of the youth on the Hinjewadi road