पैशाच्या वादातून तरुणाचा खून
By Admin | Updated: November 14, 2016 03:03 IST2016-11-14T03:03:07+5:302016-11-14T03:03:07+5:30
पैशाच्या वादातून तरुणाचा खून

पैशाच्या वादातून तरुणाचा खून
दौंड : नानवीज (ता. दौंड) येथे पैशाच्या वादातून एका तरूणाचा खून करण्यात आला आहे.
देवानंद सुनिल पवार (वय २४, रा. गोपाळवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. आज (दि. १३) दुपारी चारच्या सुनारास सुनिल पवार हा घरातून वायरलेस फाटा येथे जात असल्याचे सांगून बाहेर पडला. त्यानंतर दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान त्याच्यावर नानवीज हद्दीतील नानवीज -सोनवडी रस्त्याजवळ धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात आणले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दौंड पोलीस ठाण्यात देवानंद पवार याची आई श्रीमती हेमा पवार यांनी या प्रकरणी पैशाच्या वादातून डाल्या त्रिमुख्या भोसले, मिथून डाल्या भोसले, चाप्या डाल्या भोसले, अलका डाल्या भोसले, राम्या बच्या भोसले, मंगल बच्या भोसले, तंब्या मिलम्या पवार, झिरकोट तंब्या पवार आणि प्रेमा शिकलगर्या पवार (सर्व रा. नानवीज, ता. दौंड) यांच्याविरूध्द खून केल्याची फिर्याद दिली आहे.