आनंदनगरात तरुणाचा खून

By Admin | Updated: July 7, 2014 23:15 IST2014-07-07T23:15:26+5:302014-07-07T23:15:26+5:30

डुकरे चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमध्ये रविवारी रात्री घडली.

The blood of youth in Anandnagar | आनंदनगरात तरुणाचा खून

आनंदनगरात तरुणाचा खून

पुणो : डुकरे चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमध्ये रविवारी रात्री घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
बाप्पू अशोक माने (वय 27, रा.  आनंदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, माने रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्या घरासमोर बसलेला होता. त्यावेळी एका मोटारीमधून 4 ते 5 जण आले. काही कळायच्या आतच त्यांनी बाप्पूला मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवले. त्याला घेऊन वेगात ही मोटार निघून गेली. ही घटना त्याच्या आईने पाहिली. आईने घाबरून बाप्पूच्या लहान भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्याचा लहान भाऊ घरी आला. त्याने घराजवळ तसेच आसपासच्या भागामध्ये बाप्पूची शोधाशोध केली. काही वेळाने त्याला घराजवळ असलेल्या नाल्याच्या कठडय़ावर बाप्पू बसलेला दिसला. दुचाकी खाली लावून तो बाप्पू जवळ गेला. त्यावेळी बाप्पूने त्याला सांगितले की ‘‘मला खूप मारले आहे, माङया कंबरेखाली शक्ती राहिलेली नाही. मी लुळा पडलेलो आहे.’’ बाप्पूला उचलून भावाने घरी आणले. घरी आणल्यानंतर बाप्पूने पाणी पिण्यास मागितले. पाणी प्यायल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांच्यासह दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले. बाप्पूचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप्पूचा मृत्यू अंतर्गत जखमांमुळे झाला असण्याची शक्यता आहे. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. (प्रतिनिधी)
 
-23 जून रोजी बाप्पूची काही जणांसोबत डुकरे चोरल्याच्या कारणावरून भांडणो झाली होती. त्यावेळी त्याच्या भावालाही काही आरोपींनी उचलून नेले होते. बेदम मारहाण करून त्याला नंतर सोडून दिले होते. या भांडणाचा या खुनामागे काही संबंध आहे का, हे पोलीस तपासून पाहत आहेत. 
 
उपनगरात वराहपालनाचा व्यवसाय
-शहरातील नाल्यांमध्ये, खाणीत तसेच उपनगरांमध्ये वराह पालनाचा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय करणा:या गटांमध्ये नेहमी डुकरे चोरण्यावरुन भांडणो होत असतात. बाजारामध्ये डुकराच्या मांसाला मिळणा:या चांगल्या रकमेमुळे ही डुकरे चोरली जातात. गेल्याच आठवडय़ात खडकीमध्ये निलेश गोपाळ पवार (वय 2क्, रा. डबर चाळ, बोपोडी) या तरुणाचा अशाच कारणावरुन खून करण्यात आला होता. 

 

Web Title: The blood of youth in Anandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.