कडाचीवाडीत प्रेयसीचा खून

By Admin | Updated: February 10, 2015 01:20 IST2015-02-10T01:20:25+5:302015-02-10T01:20:25+5:30

कडाचीवाडी (ता. खेड) येथे प्रियकराने लोखंडी हातोडीने प्रेयसीच्या तोंडाचा चेंदामेंदा करून खून केला असून, प्रियकर फरार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली

The blood of the sweetheart in kadachiwadi | कडाचीवाडीत प्रेयसीचा खून

कडाचीवाडीत प्रेयसीचा खून

चाकण : कडाचीवाडी (ता. खेड) येथे प्रियकराने लोखंडी हातोडीने प्रेयसीच्या तोंडाचा चेंदामेंदा करून खून केला असून, प्रियकर फरार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.
एका महिन्यात खुनाची ही तिसरी घटना असून, खुनानंतर आरोपी फरार होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी उल्हास सुदाम गोऱ्हे (वय ३० वर्षे, रा. ठाकूर पिंपरी, खेड) हा ड्रायव्हर काम करत असून, कडाचीवाडी येथील गणपती मंदिरामागील युवराज राजाराम कड यांच्या खोलीत गेल्या एक वर्षापासून आपल्या प्रेयसीसोबत राहत होता.
त्याचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याला पत्नी व दोन मुले आहेत. प्रेयसीचे नाव अद्याप समजले नसून ती मूळची नागपूरची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल रात्री काहीतरी कारणावरून प्रेयसी व त्याचे जोरदार भांडण झाले होते. आज सकाळी साडेअकरापर्यंत खोलीचे दार उघडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी घरमालकाला बोलावले असता खून झाल्याचे उघड झाले. खोलीत रक्ताने माखलेली हातोडी आढळून आली.
खून करून आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घरमालक युवराज राजाराम कड (वय ३५ वर्षे रा. कडाचीवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The blood of the sweetheart in kadachiwadi