लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत मंचरमध्ये सात ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:11+5:302021-07-18T04:09:11+5:30
उपजिल्हा रुग्णालय मंचर, डॉ. घाडगे हॉस्पिटल रांजणी, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा ता. जुन्नर, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर, डॉ. ...

लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत मंचरमध्ये सात ठिकाणी रक्तदान शिबिर
उपजिल्हा रुग्णालय मंचर, डॉ. घाडगे हॉस्पिटल रांजणी, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा ता. जुन्नर, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर, डॉ. पोखरकर यांचे श्रीराम क्लिनिक ग्रामपंचायत गाळे पिंपरखेड, अस्मिता भवन कुरवंडी, हनुमान मंदिर एसटी स्टँडशेजारी टाकळी हाजी ता. शिरूर या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, रक्तदान म्हणजेच जीवनदान या भूमिकेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे.हा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतच्या व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रक्तदान महायज्ञात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क सुहास बाणखेले मो.न - ९८६०४४४६५८, विलास शेटे मो. न. - ९८९०१९३८३४