बारामतीत उद्या लोकमतच्या वतीने रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST2021-07-02T04:08:54+5:302021-07-02T04:08:54+5:30

लोकमत आणि कार्य हीच ओळख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ...

Blood donation camp on behalf of Lokmat tomorrow in Baramati | बारामतीत उद्या लोकमतच्या वतीने रक्तदान शिबिर

बारामतीत उद्या लोकमतच्या वतीने रक्तदान शिबिर

लोकमत आणि कार्य हीच ओळख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांच्या सहकार्याने बारामती येथे हे शिबिर होणार आहे.

सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयानजीक, पाटस रस्त्यावरील लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे हे शिबिर सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचलले आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो तसेच या महामारीविरुद्धच्या लढ्यात आपले अमूल्य योगदानदेखील देऊ शकतो. आपण या उपक्रमात सहभागी व्हावे व इतरांना देखील सहभागी होण्यास सांगा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोगो वापरणे

Web Title: Blood donation camp on behalf of Lokmat tomorrow in Baramati