८० जणांचे रक्तदान
By Admin | Updated: January 12, 2015 02:20 IST2015-01-12T02:20:50+5:302015-01-12T02:20:50+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिद्धांत कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरानिमित रक्तदान शिबिराचे

८० जणांचे रक्तदान
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिद्धांत कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरानिमित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात एकूण ८० पिशव्या संकलित करण्यात आले.
रोहकल गावातील व परिसरातील नागरीक तसेच रा.से.यो स्वयंसेवकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन केले .
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे पटवून देण्याकरिता स्वयंसेवकांनी ग्रामस्थांची भेट घेऊन जनजागृती
केली होती. याप्रसंगी डॉ.आर.एस.वैरागकर उपस्थित
होते. आयोजनासाठी रोहकलच्या सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच दिलीप काचोळे, नितीन ठोंबरे, ग्रामसेवक एस. के. ढोरे, दिनेश ठाकुर, सहकार्य केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश म्हस्के, रा. से. यो. अधिकारी बिंदूराणी राम, सतीश गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.(प्रतिनिधी)