पिपंरेमध्ये ३० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST2021-04-14T04:11:43+5:302021-04-14T04:11:43+5:30

पुरंदर तालुक्यातील पिंपरे (खुर्द) येथील समर्थ मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक उपाध्यक्ष अभय थोपटे यांच्या वतीने मंगळवारी रक्तदान ...

Blood donation of 30 people in Pipanre | पिपंरेमध्ये ३० जणांचे रक्तदान

पिपंरेमध्ये ३० जणांचे रक्तदान

पुरंदर तालुक्यातील पिंपरे (खुर्द) येथील समर्थ मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक उपाध्यक्ष अभय थोपटे यांच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ३० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.

राज्यात कोरोना विषाणूमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली म्हणून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या आव्हानावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज पिंपरे (खुर्द) येथे रक्तदान शिबिर पार पडले. मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर या संस्थेने रक्तसंकलन केले. या रक्तदानामध्ये कोरोना परिस्थिती गंभीर असताना ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रमुख आयोजक अभय दिलीप थोपटे, अविनाश थोपटे, तुषार गायकवाड, अक्षय गायकवाड यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 30 people in Pipanre