इंदापूर येथे १६० बाटल्यांचे रक्त संकलन तर ८० महिलांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST2021-03-27T04:11:41+5:302021-03-27T04:11:41+5:30
शिबिराचे उद्घाटन इंदापूर नगरीच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैत्रीण ग्रुपच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा अनुराधा प्रदीप ...

इंदापूर येथे १६० बाटल्यांचे रक्त संकलन तर ८० महिलांची मोफत आरोग्य तपासणी
शिबिराचे उद्घाटन इंदापूर नगरीच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैत्रीण ग्रुपच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा अनुराधा प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, उमाताई इंगोले आदी उपस्थित होते.
मंडई येथील रक्तदान शिबिरास नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, गजानन गवळी, बाळासोा ढवळे यांनी सदिच्छा भेट दिली. रक्त संकलन इंदापूर येथील मुक्ताई ब्लड बॅंकेचे सर्वेसर्वा अविनाश ननवरे व सोलापूर ब्लड बॅंक यांनी केले.
तर महिलांची आरोग्य तपासणी शांतिसागर हॉस्पिटल येथे विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथील डॉक्टर्सने केली. कार्यक्रम सूत्रसंचलन रमेश शिंदे यांनी केले. तर संदीप वाशिंबेकर, अतुल शेटे पाटील, व्यंकटेश वाशिंबेकर, सोमनाथ खरवडे, भावेश ओसवाल, आशू गानबोटे व अजिंक्य बंगाळे, बाबू मोरे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
--
फोटो क्रमांक : २६ इंदापूर रक्तदान शिबिर
फोटो ओळ : इंदापूर येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवर.