नाणेकरवाडीत दारूच्या नशेत विवाहितेचा खून
By Admin | Updated: July 7, 2014 05:40 IST2014-07-07T05:40:45+5:302014-07-07T05:40:45+5:30
नाणेकरवाडी (ता. खेड) येथे नवरा-बायकोच्या भांडणात दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला

नाणेकरवाडीत दारूच्या नशेत विवाहितेचा खून
चाकण : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे नवरा-बायकोच्या भांडणात दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व ठाणे अंमलदार आय. जी. शेख यांनी दिली. शिवाकली अमितकुमार रावत (वय २८, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २ जुलै रोजी सकाळी ९ च्या दरम्यान पत्नी शिवाकली व पती अमितकुमार रावत (वय ३२ वर्षे) यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडणे झाली. ही भांडणे राजेश रामसेवक सिंग (वय ३३) या वॉचमनने सोडवली. दुसर्या दिवशी मात्र ३ जुलै रोजी रात्री १२.३0 वाजता अमित हा पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर आला, तर शिवाकली ही पेटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली राजेश याने पाहिली. उपचारासाठी ससूनला दाखल केले असता आज (रविवार)तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)