अंध शेतकरी नजरकैदेत
By Admin | Updated: August 18, 2014 23:10 IST2014-08-18T23:10:17+5:302014-08-18T23:10:17+5:30
पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे जलपूजन करीत असताना मागील दोन वर्षापासून 22 गावांच्या पाणी प्रश्नी लढणा:या अंध चंद्रकांत माणिक कदम यांना ‘पोलिसांच्या नजरकैदेत’ राहावे लागले.

अंध शेतकरी नजरकैदेत
बारामती : पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे जलपूजन करीत असताना मागील दोन वर्षापासून 22 गावांच्या पाणी प्रश्नी लढणा:या अंध चंद्रकांत माणिक कदम यांना ‘पोलिसांच्या नजरकैदेत’ राहावे लागले.
कार्यक्रमापासून अवघ्या काही मीटर अंतरावर राहत असलेल्या कदम यांना गावाच्या शिवारात पाणी आल्याचा आनंद या नजरकैदेमुळे व्यक्त करता आला नाही. खुद्द त्यांनीच याबाबत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पुढा:यांनी माङयासारख्या अंध व्यक्तीबद्दल चुकीची माहिती दिली त्यामुळे हा प्रसंग ओढावला, असा आरोप त्यांनी केला.
जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कदम यांचे घर गाठले. त्यावेळी त्यांनी सकाळी नऊ ते कार्यक्रम संपेर्पयत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. त्याचबरोबर नाराजी व्यक्त केली. याबाबत चंद्रकांत कदम म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून 22 गावांतील पाण्याचा प्रश्न घेऊन मी व माङयासारखे अनेक कार्यकर्ते लढले. माङयाप्रमाणोच मुर्टीचे नामदेव कारंडे हेदेखील अंधच आहेत. नवनाथ जगदाळे यांनी जिवाची बाजी लावली. ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. या योजनेचे पहिल्या टप्प्यात 4 गावांना पाणी येणार आहे.
आंदोलन 22 गावांचे होते. त्यामुळे सर्वाना पाणी मिळाल्यावर गुढय़ा उभारून आनंद व्यक्त करू, अशी भूमिका ग्रामस्थांसमोर मांडली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. मी सामान्य अंध व्यक्ती, माङयाकडून कोणत्याही प्रकारे कोणाला त्रस होणार नाही, अशी भूमिका असताना आज सकाळी 9 वाजता अचानक एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी घरी आले. वरिष्ठांचा आदेश आहे, कार्यक्रम संपेर्पयत कुठे जायचे नाही, असे सांगितले. त्यानुसार ते देखील घराच्या ओसरीतच थांबून राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पुढा:यांनी चुकीची माहिती दिल्याने हा प्रसंग ओढावला. या कार्यकत्र्यानी आमचा आजचा आनंद हिरावून घेतला. आम्हीदेखील नेत्यांवर प्रेम करणारे आहोत. आम्हाला कार्यक्रमाला बोलावले असते तर उर्वरित गावांच्या पाणी प्रश्नी मागणी केली असती. परंतु, या कार्यक्रमापासूनच आम्हाला वंचित ठेवले. इतर 16 गावांच्या पाणी प्रश्नाला विलंब लागल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारून लढा देऊ. माझा लढा या भागातील जनतेसाठी कायम राहील. मात्र, आजच्या प्रकाराने मी व माङो कुटुंब थक्क झालो. बारामतीसारख्या तालुक्यात आनंदाच्या कार्यक्रमात नजरकैदेत राहावे लागते, यासारखी दुर्दैवाची बाब नाही.
- चंद्रकांत कदम
अंध शेतकरी