जेजुरगड पायरीमार्गावर ब्लँकेटवाटप
By Admin | Updated: January 25, 2017 01:32 IST2017-01-25T01:32:07+5:302017-01-25T01:32:07+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडकोट पायरी मार्गावरील गोरगरीब भिक्षुकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

जेजुरगड पायरीमार्गावर ब्लँकेटवाटप
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडकोट पायरी मार्गावरील गोरगरीब भिक्षुकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. मेघमल्हार प्रतिष्ठान जेजुरी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला.
सध्या उत्तर भारताकडून थंडीची लाट आली आहे. खंडोबागडाच्या पायरी मार्गावर अनाथ, अपंग भिक्षुकांची संख्या लक्षणीय आहे. दिवसभर भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणारे भिक्षुक रात्रीच्या वेळी गडकोट मार्गावर असणाऱ्या ओवऱ्या, वेशी दीपमाळांचा आश्रय घेतात. रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडणाऱ्या अनाथ अपंगांना मेघमल्हार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी (दि. २०) रात्री सुमारे शंभर ब्लँकेटचे वाटप जेजुरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिनशेठ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी गोरगरिबांना कपडे, ब्लँकेटवाटप करण्यात येते. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमासाठी मुंबईस्थित मल्हारभक्त डॉ. माया सातवळेकर व दीपक सातवळेकर यांचे सहकार्य लाभले. राहुल मंगवाणी, सचिन उपाध्ये, राहुल वीर, विशाल भोसले, रियाज पानसरे, महेश शिंदे आदींनी हा उपक्रम राबविला.(वार्ताहर)