बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारल्याने ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:11 IST2021-02-08T04:11:29+5:302021-02-08T04:11:29+5:30

पुणे : रस्त्याने जाताना बहिणीला धक्का देणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणावर ब्लेडसारख्या कटरने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ...

Blade stabbed her when she asked for an answer | बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारल्याने ब्लेडने वार

बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारल्याने ब्लेडने वार

पुणे : रस्त्याने जाताना बहिणीला धक्का देणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणावर ब्लेडसारख्या कटरने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी महेश गणेश वेदपाठक (वय २७, रा. येरवडा) याला अटक केली आहे. ही घटना कोरेगाव पार्क परिसरातील महात्मा गांधी गार्डनजवळ ४ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडला.

याप्रकरणी परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांसह शिर्डी येथे गेले होते. गुरूवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ते खासगी ट्रॅव्हल्सने कोरेगाव पार्क परिसरात उतरले. तेथून घरी जाण्यासाठी थांबले असता आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीला जाणूनबुजून धक्का दिला. हा प्रकार फिर्यादी यांनी पाहिला. त्यामुळे त्याने याबाबत आरोपीला जाब विचारला. त्याचा राग आरोपीला आल्यामुळे त्याने फिर्यादींना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, त्याच्याजवळ असलेल्या ब्लेड सारख्या कटरने त्याच्यावर वार केले. यामध्ये फिर्यादी हा जखमी झाला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. असता मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Blade stabbed her when she asked for an answer