लोहार बातमीला कोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:31+5:302021-06-16T04:13:31+5:30
ज्या घरगुती ग्राहकांची वीजजोडणी प्रत्यक्षात थ्री फेजची आहे; मात्र बिलांवर सिंगल फेजची नोंद करण्यात येत होती, ती बिले दुरुस्त ...

लोहार बातमीला कोट
ज्या घरगुती ग्राहकांची वीजजोडणी प्रत्यक्षात थ्री फेजची आहे; मात्र बिलांवर सिंगल फेजची नोंद करण्यात येत होती, ती बिले दुरुस्त करण्यात आली आहेत. वीजजोडणी सिंगल फेज असताना वीज बिलावर मात्र थ्री फेजची नोंद करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वारजे उपविभागाकडून पुन्हा वीज बिलांची पडताळणी करण्यात आली. यात केवळ दोन वीजग्राहकांकडे सिंगल फेज वीजजोडणी असताना त्यांच्या वीज बिलावर थ्री फेजची नोंद झाल्याची निदर्शनास आले. त्यानुसार ही दोन्ही वीज बिल तत्काळ दुरुस्त करून देण्यात आली आहेत.
सिंगल फेज व थ्री फेजच्या घरगुती वीजग्राहकांसाठी फक्त स्थिर आकारात फरक आहे. मात्र, वीजआकार दर एकसमान आहे. त्यामुळे वीज बिलातील थ्री व सिंगल फेजच्या स्थिर आकारामध्ये असलेला फरक दुरुस्त करून देण्यात आला आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या वीज बिलाबाबत अशा तक्रारी असतील त्यांचे तत्काळ निवारण करण्यात येईल.
-निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी महावितरण