शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात धान्य काळाबाजार करणा-या दुकानदारांचे परवाने रद्द,  ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 21:12 IST

पुणे : गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून त्याचा काळाबाजार करणा-या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. दुकानांमध्ये  ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले असून मागील महिन्यात तीन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले होते.पिंपरीमधील परवानाधारक बी. एम. भिलारे यांच्या दुकानामध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ५२.२७ क्विंटल ...

पुणे : गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून त्याचा काळाबाजार करणा-या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. दुकानांमध्ये  ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले असून मागील महिन्यात तीन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले होते.पिंपरीमधील परवानाधारक बी. एम. भिलारे यांच्या दुकानामध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ५२.२७ क्विंटल तांदळाचा साठा कमी आढळून आला.त्यांना बाजार भावाप्रमाणे ३० रुपये प्रती किलोदराने सुमारे एक लाख ५६ हजार ८१० रुपयांचा दंड करण्यात आला. त्यांची अनामत रक्कम सरकारजमा करण्यात आली आहे. तर दुस-या प्रकरणात पी. पी. भोसले यांच्या नावाने परवाना आहे. त्यांच्या नावाने भावेश अगरवाल हा दुकान चालवित होता. त्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा भोसले यांना सादर करता आला नाही. त्यांच्या दुकानामध्ये १४.५२ क्विंटल गहू आणि ८६.३० क्विंटल तांदूळ जास्त आढळून आला. काळाबाजार करण्याच्या हेतूने साठविण्यात आलेल्या या धान्यसाठ्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यांचीही अनामत रक्कम सरकारजमा करण्यात आली आहे.यापूर्वी अनमोल नारायणदास उणेचा यांना ४४ लाख ३७ हजार ३२० रुपये, सुनीता अशोक अगरवाल यांना १८ लाख १५ हजार रुपये आणि लक्ष्मीबाई श्याम सोनवणे यांना सहा लाख ९९ हजार २०० रुपये दंड करण्यात आला आहे. त्यांचीही अनामत रक्कम जप्त करून परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी आर. बी. पोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे