कुरकुंभकरांना काळ्या पाण्याची शिक्षा
By Admin | Updated: August 13, 2014 04:53 IST2014-08-13T04:53:45+5:302014-08-13T04:53:45+5:30
येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पांतील ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा कुरकुंभकरांना भोगावी लागत आहे.

कुरकुंभकरांना काळ्या पाण्याची शिक्षा
कुरकुंभ : येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पांतील ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा कुरकुंभकरांना भोगावी लागत आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या शेतजमिनीही नापीक झाल्या आहेत. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.
कुरकुंभ येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पातील विविध कारखान्यांमधून रसायनयुक्त काळेपाणी जमिनीमध्ये मुरवण्याच्या घटना घडत आहेत. येथील ग्रामस्थांच्या तसेच कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी, कूपनलिका १00 टक्के प्रभावित झाल्यामुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध आले आहेत.
परिसरातील सर्व ग्रामस्थ व औद्योगिक वसाहतीमध्ये कामानिमित्त आलेल्या कामगारांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकरणाचा ओझा ग्रामपंचायतीवर पडत आहे. त्यांना पाणीपुरवठ्यावर सातत्याने नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)