शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 19:34 IST

गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरीत्या सुरू असलेली विक्री सिंहगड रोड पोलिसाच्या पथकाने उघडकीस आणली. गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.विकास धोंडाप्पा आकळे (३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ. रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वीदेखील अशाप्रकारे कारवाई करण्यात आली होती. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रुक भागात एकाने अवैधरीत्या गॅसचा साठा केला असून, त्याची चोरून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे एक टेम्पो उभा असलेला दिसला.पोलिसांनी त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये गॅसच्या टाक्या आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी विकास आकळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याने या गॅस सिलिंडर कोणाकडून आणले, त्याची विक्री कुठे केली जाते, याबाबतचा तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.ही कारवाई सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, कर्मचारी संजय शिंदे, आण्णा केकाण आणि उत्तम तारू यांच्यासह पथकाने केली.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड