राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाचे ‘पालक’

By Admin | Updated: September 17, 2015 02:45 IST2015-09-17T02:45:26+5:302015-09-17T02:45:26+5:30

महापालिकेतील प्रश्नाबाबत यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेऊन पाठपुरावा करायचे. मात्र, राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाचे नेते आणि पालकमंत्री

BJP's 'spinach' on NCP's fort | राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाचे ‘पालक’

राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाचे ‘पालक’

पिंपरी : महापालिकेतील प्रश्नाबाबत यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेऊन पाठपुरावा करायचे. मात्र, राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाचे नेते आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे.
राज्यात व केंद्रात काँग्रेस आघाडी तसेच भाजपा-सेनेची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रश्नांबाबत आजवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बैठका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बैठका घेतल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आढावा बैठक घेतली आहे. मात्र, राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना गती मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या गडावर पहिल्यांदाच भाजपाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या १९ सप्टेंबरला महापालिका भवनात पालकमंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. त्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ‘स्थायी’चे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम यांसह विषय समित्यांचे सभापती, गटनेत्यांना बोलावले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's 'spinach' on NCP's fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.