शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून पुण्यासाठी नवा चेहरा? ; स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:46 IST

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन वेळा बाजी मारली आहे...

ठळक मुद्देइच्छुकांच्या मोर्चेबांधणीला अडसर 

पुणे : भारतीय जनता पार्टीकडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी एकदम नवा व राजकारणाबाहेरचा चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. धक्काशैलीचे राजकारण करणाऱ्या अमित शहा यांनीच पक्षाच्या प्रदेशस्तरावरील पदाधिकाऱ्यांना त्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळाली. प्रदेशपातळीवरूनच याबाबत चाचपणी सुरू असून त्याची कुणकूण लागली असल्यामुळे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन वेळा बाजी मारली आहे. पण ते दोन्ही उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत व मतदारसंघही हातातून गेला. सन २०१४ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भाजपाकडे आला. आता तो कायम रहावा यासाठी पुर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपाचा उमेदवार दुसऱ्यांदा येत नाही हा इतिहास असेल तर दुसरा उमेदवार देऊन मतदारसंघ कायम ठेवायचा या विचारातूनच पक्षाबाहेरच्या पण प्रभावी असणाऱ्या उमेदवाराबाबत विचार करण्यात येत आहे.विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट हेही पुणे शहरातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. दोघांचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोघांनाही पक्षाच्या दिल्लीस्तरावरील नेत्यांबरोबर भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. शिरोळे यांनी मागील पाच वर्षात पक्षात वरिष्ठ वतुर्ळावर चांगले संबध प्रस्थापित केले आहेत. बापट यांची भिस्त स्थानिक व राज्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणात येण्याची इच्छा यावर आहे. मात्र, पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या या हालचालींमुळे या दोन्ही उमेदवारांच्या प्रयत्नांना मर्यादा पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक