शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: CM पुत्राच्या मतदारसंघात भाजपचं 'कल्याण', फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 21:35 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे

पुणे - राज्यात मागील काही दिवसांपासून भाजपानं 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतले आहे. त्यात शतप्रतिशत भाजपा कार्यक्रम राबवला जाणार आहे. देशातील १४० मतदारसंघात केंद्रीय नेतृत्वानं विशेष लक्ष देण्याची जबाबदारी मंत्र्यांवर टाकली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, शरद पवारांचा बारामती टार्गेटवर आहे. तर, याच १६ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा ३ दिवसीय कल्याण लोकसभा दौरा आयोजित करण्यात आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने  १६ मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे या १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, नुकतेच भाजपने शिंदे गटासोबत संसार थाटला आहे. तरीही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपुत्राच्याच मतदारसंघात भाजपने  लक्ष्य केल्यामुळे चर्चेला उधाण आले. त्यावर, आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांच्या जागांवर आम्ही का दावा करू? असा सवाल करत फडणवीसांनी कल्याणमधील लोकसभा सीटवर कुठलाही दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उर्वरित शिवसेनेच्या जागांबाबतचा निर्णय शिंदे आणि भाजपा एकत्र घेईल, असेही त्यांनी सांगितले. 

कल्याण मतदारसंघावर भाजपा दावा करणार?

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत असे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रभारी संजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत येत्या ११ ,१२,१३ तारखेला म्हणजेच रविवारी ,सोमवारी ,मंगळवारी माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेkalyan-pcकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे