धानोरीच्या चौधरीनगरात भाजपाची पदयात्रा

By Admin | Updated: February 15, 2017 02:42 IST2017-02-15T02:42:09+5:302017-02-15T02:42:09+5:30

प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंंगरे यांनी मागील ५ वर्षांत चौधरीनगरमधील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत.

BJP's footsteps in Chowdharynagar, Dhanori | धानोरीच्या चौधरीनगरात भाजपाची पदयात्रा

धानोरीच्या चौधरीनगरात भाजपाची पदयात्रा

विश्रांतवाडी : प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंंगरे यांनी मागील ५ वर्षांत चौधरीनगरमधील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून सोडविल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने विशेष आभारी आहोत.
तसेच, परिसरात विकासाची गंगा अखंड चालू ठेवण्यासाठी आम्ही चौधरीनगरचे नागरिक त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधील चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास स्थानिक रहिवासी मारुती देवरे यांनी दिला.
भाजपाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, माजी नगरसेविका अलका अविनाश खाडे, मारुती (नाना) सांगडे व किरण नीलेश जठार यांच्या प्रचारार्थ धानोरीच्या चौधरीनगरमधील रस्ता क्रमांक १ ते १९ दरम्यान प्रचारयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या पदयात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
या वेळी मारुती देवरे, शोभा पालांडे, अरुण साळवे, तेजस टिंगरे, संगीता राजपूत, रवींद्र देवरे, प्रकाश पवार, बापू कांबळे, राकेश कदम, मंगेश निकम, अमित चौरे, अश्पाक मकानदार, सचिन पालांडे, संदीप पवार, मल्लाप्पा मेलगे, प्रभू बर्गे,
प्रमोद गायकवाड, प्रदीप राजपूत, महेंद्र शिर्के, अविनाश कांबळे, संदीप जठार, विजय राजपूत, आकाश गायकवाड, गणेश दाहोत्रे, नरेश राजपूत, सागर पाटणकर, अनिल निकोळे, काशिनाथ जाधव आदी नागरिक, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनेसहभागी झाल्या होत्या.

Web Title: BJP's footsteps in Chowdharynagar, Dhanori