ई-बाईक्सच्या नावाखाली भाजपचे आर्थिक चार्जिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:34+5:302021-07-23T04:08:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात भाडेतत्वावर ई-बाईक पुरविण्यासाठी आणि या बाईक्सकरिता ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणीकरिता दोन खाजगी ...

BJP's financial charging under the name of e-bikes | ई-बाईक्सच्या नावाखाली भाजपचे आर्थिक चार्जिंग

ई-बाईक्सच्या नावाखाली भाजपचे आर्थिक चार्जिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात भाडेतत्वावर ई-बाईक पुरविण्यासाठी आणि या बाईक्सकरिता ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणीकरिता दोन खाजगी कंपन्यांना दिलेली मान्यता म्हणजे, ई-बाईक्सच्या नावाखाली सत्ताधारी भाजपचे आर्थिक चार्जिंग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे़

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ई-बाईक्सकरिता दोन खासगी कंपन्यांना स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत घाईघाईने मंजुरी दिली आहे. या कंपन्यांकडून निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ला होणाऱ्या आर्थिक लाभापोटीच हा निर्णय घेतला आहे. सदर मंजुरी देताना ‘लेटर ऑफ एक्स्प्रेशन’ मागविणे, निविदा प्रक्रिया राबविणे अशा कोणत्याच प्रक्रियेची पूर्तता न करता भाजपने ई-मनमानी करीत या कामांना मंजूरी दिली. त्याचा निषेध करत असल्याचे ‘राष्ट्रवादी’ने म्हटले आहे.

सत्ताधारी भाजपने सर्व नियमांचे व प्रक्रियेचे पालन करावे अशी मागणी पक्षाच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. या क्षेत्रातील जागतिक कंपन्यांकडून निविदा मागवाव्यात असेही त्यांनी सांगितले. पुणे राज्यातील सर्वांत मोठे शहर असून पुण्याचे पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आम्ही ई-बाईक्सच्या निर्णयाचे निश्चितच स्वागत करतो. मात्र केवळ पैशांचा विचार करुन घाईने ई-बाईक्सचा घाट घातला जात असल्याचे जगताप म्हणाले.

Web Title: BJP's financial charging under the name of e-bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.