भाजप भ्रष्टाचार संपविणार : वैरागे

By Admin | Updated: February 13, 2017 02:12 IST2017-02-13T02:12:09+5:302017-02-13T02:12:09+5:30

पालिकेतील भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष संपवेल, असे डॉ. भरत वैरागे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलिसबरी पार्कचे

BJP will end corruption: Vairaga | भाजप भ्रष्टाचार संपविणार : वैरागे

भाजप भ्रष्टाचार संपविणार : वैरागे

बिबवेवाडी : पालिकेतील भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष संपवेल, असे डॉ. भरत वैरागे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलिसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भीमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली.
डॉ. वैरागे म्हणाले, महापालिकेत केंद्र व राज्याप्रमाणे भाजपाची सत्ता आणेल. मागील अनेक वर्षांपासून खुंटलेला विकास माहिती आहे. त्यामुळे भाजपाच्या या चारही कार्यक्षम उमेदवाराला भरघोस मताने ही जनता निवडून देईल. ‘सबका साथ-सबका विकास’ ही भूमिका घेऊन भाजपा काम करत आहे. केंद्रात व राज्यातील विकासकामाची गंगा आपल्या प्रभागात आणण्यासाठी चारही उमेदवार कटीबद्ध आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता भाजपाचेच चारही नगरसेवक निवडून देतील, असा मला विश्वास आहे.
यावेळी नगरसेविका मनीषा चोरबेले, वंदना भीमाले, डॉ. भरत वैरागे, अविनाश शिळीमकर, राजेंद्र सरदेशपांडे, हेमंत देशपांडे, गणेश शेरला, सुशील लोंढे, शरद पायगुडे, किरणराम सिन्हा, दीपक देशपांडे, अतिश काथवटे, शाम आवळे, अनिल भन्साळी, दिलीप कर्णावट, मनोज भापकर, मनीष शिंदे, निखील शिळीमकर, चेतन चावेर, लक्ष्मण कनोजे, मयूर कोठारी, संजय शिळीमकर, अरुण काळे, संदीप पारखे, ओमप्रकाश जैन, राजेंद्र ललवाणी, प्रशांत डिकवळे, ज्ञानेश्वर सलगर, ओकार अकाले, चंद्रकांत गायकवाड, बाबूराव पक्षाळे, नीलेश कोठारी, जयेश कर्णावट, नकुल संघवी आदी उपस्ति होते.
(वार्ताहर)

Web Title: BJP will end corruption: Vairaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.