शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हिंदू धर्माचे नाव घेते पण सरकार मात्र अधर्माने चालवते; गोपाळ तिवारींचा आरोप

By राजू इनामदार | Updated: April 28, 2023 21:22 IST

सत्य, न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत

पुणे: काँग्रेसच्या वॉरंटी गँरंटीबद्दल बोलणारे पंतप्रधान फक्त २ वेळा झालेत, काँग्रेस १०वेळा निवडून आली आहे, काँग्रेसची लाईफ टाईम गँरंटी आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांंनी केली. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीचे भाजपकडून होत असणारे अवमुल्यन यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्यात बोलताना तिवारी यांनी भारतीय जनता पक्ष हिंदू धर्माचे नाव घेत आहे, पण सरकार मात्र अधर्माने चालवत आहे असा आरोप केला. संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोके ठेवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष संसदेत मात्र लोकशाहीतील कोणतेही संकेत पाळत नाहीत. सत्य,न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत असे ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत भाजपवर आरोप केले आहेत. त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत हिंदू धर्माचे नाव घेत सत्तेवर आले पण त्यांचा हिंदू धर्म सत्तेपूरताच आहे. देशातील जवानांचे बळी जात असताना हे करत तरी काय होते. त्यांचेच राज्पाल असलेल्या सत्यपाल मलिक यांच्या एकाही आऱोपाला उत्तर द्यायचे धाडस त्यांच्यात नाही  काँग्रेसने नूकसान सोसूनही लोकशाही मुल्य जपली, वाढवली. पण भाजपला ते जमत नाही. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे असे तिवारी म्हणाले.

राजीव गांधी स्मारक समिती या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर जाणार आहे. युक्रांद ,काँग्रेस वकिल सेल हे बरोबर आहेत. आम्ही लवकरच स्वाक्षरी मोहिम सुरू करत आहोत. जनतेमध्ये या विषयावर जाग्रुती करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार