भाजपला प्रभाग 1 मध्ये पाठिंबा : मुळीक
By Admin | Updated: February 13, 2017 02:11 IST2017-02-13T02:11:16+5:302017-02-13T02:11:16+5:30
भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग एकमधील उमेदवारांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता, या चारही उमेदवारांचा विजय निश्चित

भाजपला प्रभाग 1 मध्ये पाठिंबा : मुळीक
विश्रांतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग एकमधील उमेदवारांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता, या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे मत, आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
भाजपच्या धानोरी-कळस-विश्रांतवाडी प्रभाग एकमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ धानोरी परिसरात रविवारी (दि. १२) काढलेल्या पायी रॅलीत सुमारे ३ हजार नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. जगदीश मुळीक, प्रभाग एकचे उमेदवार अनिल (बॉबी) टिंगरे, मारुती सांगडे, किरण जठार व अलका खाडे यांच्यासह माजी सरपंच दत्तात्रय टिंगरे, माजी नगरसेविका रेखा दत्तात्रय टिंगरे, बाबुराव टिंगरे, अशोक टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, महेश टिंगरे, नितीन टिंगरे, निवृत्ती चौधरी, हनुमंत परांडे, राजेश लोकरे, भरत टिंगरे, धनंजय जाधव, रामभाऊ टिंगरे, दिलीप टिंगरे, स्वप्निल टिंगरे, बबनराव खलसे, हनुमंत गायकवाड, मारुती देवरे, रमेश गायकवाड, शांताराम टिंगरे, कांतिलाल परांडे, संजय टिंगरे, तुषार परांडे, विनोद परांडे, ज्ञानेश्वर आमटे, नितीन सुपले आदी सहभागी झाले.