शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे १०० हून अधिक नगरसेवक असणार : खासदार गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 20:43 IST

गिरीश बापट यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

पुणे : भाजपचे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील. असे सांगून खासदार गिरीश बापट यांनी २०२२ मध्ये होणार्‍या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकांसोबतच्या बैठकांमध्ये नगरसेवकांनी केलेली विकास आणि सामाजिक कामे, उभारलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी आवश्यक निधी आदींबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी माहिती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे याप्रसंगी उपस्थित होते.

बापट म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना पुण्यात सुरू आहेत. मागील राज्य शासनाने महापालिकेला मोठा निधी दिला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप  काहीच निधी दिला नाही. तरीही या काळात नगरसेवकांनी विशेषतः सामाजिक काम खूप केले आहे. कोरोनाचे संकट यशस्वीपणे हाताळले. 

प्रभागातील छोटी छोटी कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी असते. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.  कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न केला. स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी यासाठी सकारात्मक भुमिका पार पाडली. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकर्‍यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये निधी दिला. विमानतळ, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्पाची कामे पुढे नेली. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार. परंतु यावेळी पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू असा मला विश्वास आहे. गावे समावेश करण्यास विरोध नाही. परंतु तेथील गावात सुविधा करण्यास राज्य शासनाने निधी दिला पाहिजे. आतापर्यंत जिल्हा परिषदेत ही गावे होती. तेथे कामे करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस कामे करण्यास कमी पडले. हे अपयश झाकण्यासाठी गावे पालिकेत घेण्याचा घाट घातला आहे. - जगदीश मुळीक, शहर अध्यक्ष, भाजप---------

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक