मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोध

By Admin | Updated: August 24, 2015 03:07 IST2015-08-24T03:07:42+5:302015-08-24T03:07:42+5:30

कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्या भूमिपूजन समारंभ होणार आहे. मात्र ऐनवेळी या प्रकल्पाला सत्ताधारी

BJP opposition to Malinisaran project | मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोध

मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोध

मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोध
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्या भूमिपूजन समारंभ होणार आहे. मात्र ऐनवेळी या प्रकल्पाला सत्ताधारी भाजपाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध झाला आहे. प्रकल्पाच्या नियोजित जागेवरील शाळा स्थलांतरित करण्यास विरोध असून, नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली आहे.
बुट्टी स्ट्रीट येथे उभारल्या जाणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ उद्या (दि. २४) सकाळी दहा वाजता आयोजिण्यात आला आहे. डिफेन्स इस्टेटचे महासंचालक रविकांत चोप्रा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डिफेन्स इस्टेटचे प्रिन्सिपल डायरेक्टर जोगेश्वर शर्मा, बोर्डाचे अध्यक्ष ए. के. त्यागी आदी उपस्थित राहणार आहेत. रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल या प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर आहे. शाळेचे स्थलांतर बाबाजान चौकातील बोर्डाच्या गोडाऊनच्या जागेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही शाळा स्थलांतरित करण्यास भाजपाच्या कामगार आघाडीचे माजी शहराध्यक्ष शशिधर पूरम आणि कँटोन्मेंट बोर्ड विभागाचे माजी सरचिटणीस विनायक काटकर यांनी विरोध केला आहे.
सध्या या शाळेमध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. बाबाजान चौकात शाळा स्थलांतरित केल्यानंतर या
परिसरातील विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. तसेच पुढील जून महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंत इमारतीचे बांधकाम होणे शक्य नाही, कारण त्यासाठी बोर्डाकडे निधी नाही. तरीही बोर्डाकडून घाई करण्यात येत असल्याचा पूरम आणि काटकर यांचा दावा आहे. या प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. हा प्रश्न अद्याप सोडविण्यात आलेला नसताना भूमिपूजन समारंभ घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP opposition to Malinisaran project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.