शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-राष्ट्रवादीमध्ये घमासान, गुंड शब्दावरून वादळ, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:34 IST

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांमध्ये महापालिका सभागृहात सोमवारी वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला.

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांमध्ये महापालिका सभागृहात सोमवारी वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला. राष्ट्रवादीच्या सदस्याने भाजपाला उद्देशून गुंड शब्दाचा वापर केल्यामुळे हे घमासान झाले.रस्ते खोदाईसाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी परस्पर परवानगी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केले. तसे दोन मोठे फ्लेक्सच ते सभागृहात घेऊन आले होते. सुरुवातीला बाबूराव चांदेरे बोलले, त्यांनी या विषयावर प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. तोपर्यंत महेंद्र पठारे उभे राहिले. त्यांनी गुरुवारी सकाळी प्रभागात फिरत असताना भाजपाच्या गुंडांच्या उपस्थितीत रस्तेखोदाई सुरू असल्याचे सांगत भाजपाच्या एका पदाधिकाºयाचे नावही घेतले. त्यांच्या भाषणातील भाजपाच्या गुंडांच्या व प्रत्यक्ष नाव ऐकल्यानंतर लगेचच भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहात ओरडण्यास व शब्द मागे अशी मागणी करण्यास सुरुवात केली.विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे-पठारे यांची समजूत घालत होते, मात्र ते माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहेत, असे सांगत माघार घेण्यास नकार देत होते. तोपर्यंत भाजपाचे सदस्य महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत जमा झाले. तुपे तिथे आले त्या वेळी भाजपाच्या दीपक पोटे यांनी काहीतरी अपशब्द वापरले. त्यावरून तुपे व पोटे यांच्यातच खडाजंगी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर दोघेही धावून जात होते. शिंदे, तसेच चांदेरे व अन्य काही सदस्य तुपे यांना तर श्रीनाथ भिमाले व अन्य काही सदस्य पोटे यांना मागे ओढत होते. थोड्याच वेळात महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेचे रुपांतर युद्धभूमीत झाले. पठारे यांनी मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. भाजपा सदस्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. बराच वेळ ही घोषणाबाजी सुरू होती. ज्येष्ठ सदस्यांचे कोणीही ऐकत नव्हते. महापौर मुक्ता टिळक याही सर्वांनी जागेवर बसावे असे सांगत होत्या, पण तेही कोणी ऐकले नाही. अखेरीस महापौरांनी पठारे कामकाजामधून पठारे यांचे शब्द वगळण्याचा आदेश दिला. त्यानंतर सभागृह शांत झाले व पुढील कामकाज सुरू झाले.नंतर झालेल्या भाषणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभाष जगताप यांनी बोलता बोलता एका उद्योजकाला १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजपाच्या एका पदाधिकाºयाचा उल्लेख केला. त्यावरूनही पुन्हा भाजपाच्या सदस्यांनी आरडाओरडा सुरू केला. पोटे यांनी ते युवा मोर्चात नव्हतेच, असे सांगितले तर सभागृहनेते भिमाले यांनी तो विषय इथे काढायचे कारण नाही, विषयाशी संबंधित बोलावे असे सांगितले. तरीही जगताप यांनी नेटाने हा विषय लावून धरला व बरेच बोलून घेतले....अन् सभा तहकूब केलीदिवाळीमुळे विषय दाखल करून घेऊन सभा तहकूब करण्यात आली. राष्ट्रवादीचे सदस्य अ‍ॅड. गफूर शेख तरीही वृक्ष प्राधिकरण समितीचा त्यांचा विषय चर्चेसाठी घेण्याचा आग्रह धरत होते. योगेश ससाणे, प्रकाश कदम आदी सदस्यांनीही चर्चा होऊ द्यावी, सभा तहकूब करू नये, अशी मागणी केली, मात्र महापौर किंवा कोणीही त्यांचे न ऐकता सभा तहकुबीचा निर्णय घेतला.रस्ते खोदाईवरून सत्ताधा-यांसह विरोधकांकडूनही आयुक्त धारेवरकेबल कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी परस्पर परवानगी दिल्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना, मनसे यांनीही आयुक्त कुणाल कुमार यांना धारेवर धरले. आयुक्तांनी केलेला खुलासाही अमान्य करण्यात आला. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तत्काळ रद्द करा, असा आदेशच आयुक्तांना सभागृहात दिला.दुपारी ३ वाजता सभेचे कामकाज सुरू झाले ते याच विषयाने. राष्ट्रवादी काँग्रेसने थकबाकी असणाºयांना रस्ते खोदाईची परवानगी दिली कशी, असा सवाल विचारणारे फलक सभागृहात झळकावले. बाबूराव चांदेरे यांनी स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेला काहीही कल्पना न देता आयुक्तांनी परवानगी दिली कशी, अशी विचारणा केली. त्यानंतर झालेली सर्व भाषणे आयुक्तांना धारेवर धरणारीच होती.महापालिकेने रस्ते खोदाईसाठी मंजूर केलेल्या धोरणाच्या विरोधात आयुक्तांनी एकाच कंपनीसाठी म्हणून नियम डावलून त्यांना रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली दिली असल्याचा आरोप बहुसंख्य सदस्यांनी केला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPuneपुणे