शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पिंपरी महापालिकेत भटक्या कुत्र्यांवरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:19 IST

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देआंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीचीभटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे

पिंपरी : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. लहान कुत्र्यांची पिले सोडण्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शहाण्णव कुळी शेतकरीवरून अभूतपूर्व गोंधळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १९) झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाही, याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी चे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी आपली पाळीव कुत्र्यांची पिले महापालिकेत आणली होती. ही बाब भाजपाच्या लक्षात आली. तसेच पिले सभागृहात घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. लहान पिलांवर अन्याय होत आहे, हा मुद्दा सभागृहात भाजपा नगरसेवकांनी लावून धरला. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, लहान पिल्लांना पिशवीत आणले. गुदमरून काही घडले तर त्याला जबाबदार कोण? हा प्रकार करणाऱ्यांवर प्राणिमित्र कायद्यान्वये (पेटा) गुन्हा दाखल करायला हवा.  राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले,भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अधिकारी फोन उचलत नसतील तर गंभीर बाब आहे. सभागृहात कुत्रे आणण्यापर्यंतची वेळ का आली याचाही विचार व्हावा. राजकारण करू नये. भाजपाच्या आशा शेंडगे म्हणाल्या,विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे. परंतु, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. मुक्या जनावरांवर अत्याचार होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई करायलाच हवी.  विकास डोळस म्हणाले, विरोधकांनी प्रशासनावर राग काढायला हवा होता. मुक्या जनावरांवर अन्याय करू नये.नीता पाडाळे म्हणाल्या, कुत्री, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुकरे शिरतात तरीदेखील त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. डुकरांना पकडण्यासाठी अधिकारी हप्ते घेतात.भाजपाचे संदीप वाघेरे म्हणाले, शहर प्राणिसंग्राहालय झाले आहे. डुकरे, कुत्री, भाकड जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. प्रशासन करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. पशुवैद्यकीय अधिकारी दगड आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले,शहरात मोकाट कुत्री, डुकरांचा त्रास होत आहे. आंदोलनाची वेळ का येते, या मुद्यापासून दूर जाऊ नये, आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाdogकुत्रा