शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:57 IST

मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज

भाजपाचे नेते किरीट सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी राडा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्कीही केली. या गदारोळात सोमय्या पायऱ्यांवर पडले. यात दुखापत झालेल्या सोमय्या यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माफिया, मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाहीत.

सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न-

किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता.  सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. 

नेमकं काय झाले? 

कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला होता. 

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाPuneपुणेPoliticsराजकारण