शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:32 IST

आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत..

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळांच्या गळ्याला नखं लावायचं काम सुरू एकवेळ मंदिराला देणगी देऊ नका आपण शाळेला देणगी द्या, यातून उद्याची पिढी तयार होणार

बारामती (सोमेश्वरनगर) : हमीभाव हजार- बाराशे रुपयांनी कमी देऊन एकरी दोन हजार रुपये देत आहेत.शेतकऱ्यांचे खिशे कापून त्यांनाच परत पैसे देत केंद्र सरकार काय उपकार करत नाही. हे  सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी ही चोरांची टोळी आहे, असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला.     बारामती तालुक्यातील निंबुत येथे बाबलाल साहेबराव काकडे विद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाम काकडे होते. यावेळी सतीश खोमणे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश काकडे, प्रमोद काकडे, आर. एन.शिंदे, नीता फरांदे, सविता काकडे, नीलिमा जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध बस थांब्याचे उदघाटन, तसेच सायकलींचे वाटप शेट्टी त्यांच्या हस्ते पार पडले. शेट्टी म्हणाले, सरकारने ठरवून दिलेला हमीभाव कमी देत आहेत, हमीभाव आणि बाजारभाव यात हजार ते बाराशे रुपयांचा फरक पडत आहे. आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत, असी नेहमीच संघटनेची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आपण कायमच याला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले,शिक्षणाचे सध्या बाजारीकरण झाले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गळ्याला नखं लावायचं काम सुरू आहे, अनुदानित शाळा बंद पाडायच्या आणि अनेक शिक्षण महाशयांनी खाजगी शाळा सुरू कराव्यात असाच सरकारचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला, शाळा बंद पडल्याने मुलांना शिक्षणासाठी लांब जावत असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत चालली असल्याची खंत त्यानी व्यक्त केली, एकवेळ मंदिराला देणगी देऊ नका आपण शाळेला देणगी द्या, यातून उद्याची पिढी तयार होणार आहे असे आव्हान खासदार शेट्टी यांनी केले.    सोमेश्वर कारखान्यावर न्यायालयात असलेले तीन दावे केवळ अजित पवार यांच्या सांगण्यावरून माघारी घेतले, आता जर सोमेश्वर कारखान्यासह राज्यातील सर्वच कारखान्यांनी येत्या आठवड्यात व्याजासह पूर्ण एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग नाही केली तर सर्व कारखान्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सतीश  काकडे यांनी सांगितले. 

टॅग्स :BaramatiबारामतीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाCentral Governmentकेंद्र सरकार