शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भाजप शहराध्यक्ष एंजटगिरी करु नका : अरविंद शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 13:33 IST

शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमहापौरांवर अशा प्रकारे दबाब आणणे अत्यंत चुकीचे  

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपच्या शहर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन काही खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. यामध्ये फोर्स कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर पीएमपीएलकडून चार दिवसांत अभिप्राय मागविण्यात आला होता. परंतु, याकडे पीएमपीएलने दुर्लक्ष केल्याने भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौरांना पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगुन दमबाजी केली आहे. महापौर शहराच्या आहेत, हे त्यांनी विसरू नये.  शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये, असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने विविध उद्योग समूहांकडून प्रस्ताव आणि सूचना मागविल्या होत्या. या आवाहानाला प्रतिसाद देत फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीकडून एक महिन्यापूर्वी पुणे स्टेशन ते कोथरुड, स्वारगेट ते कोथरुड, पुणे स्टेशन ते वडगाव शेरी या तीन मार्गावर कंपनीच्या माध्यमातुन एसी मिनी बस सेवा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला होता. या बसची वारवारंता ७ ते १० मिनिटांची असेल, यामध्ये पीएमपीएला कोणतीही गुंतवणुक नसेल, मनुष्यबळाची गुंतवणूक आॅपरेटर स्टेक होल्डरच्या वतीने पुरविले जाणार, या बसेसवरील जाहिराती आॅपरेटर स्टेक होल्डरकडे राहणार, तीन महिन्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग करण्यात येईल, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चार दिवसांत अभिप्राय देण्याच्या महापालिका आयुक्तांनी सूचना देऊन देखील पीएमपीएल प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे  पीएमपीएलच्या कारभारावर नाराज झालेले भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगितले.     याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, यांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या नावाखाली भाजपजे शहराध्यक्ष गोगावले हे महापालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करत आहेत. महापौरांना असे आदेश देणे योग्य नाही, त्या शहराच्या महापौर असतात पक्षाच्या नाहीत. त्यामुळे महापौरांवर अशा प्रकारे दबाब आणणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.  गोगावले यांनी संघटनात्मक कामात लक्ष घालावे. ठेकेदारीत लक्ष घालु नये. त्यासाठी भाजपचे पालिकेतील पदाधिकारी आहेत असा टोला शिंदे यांनी मारला.-----------------------अध्यक्ष तुम्हीसुद्धा.... महापालिकेतील भाजप भ्रष्टाचाराने बरबटली असताना आता भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी खाजगी कंपनीसाठी दलाली सुरु केली आहे.  शहराध्यक्षांनी पक्ष संघटनेचे काम करणे अपेक्षित असताना ते दलालीच्या रेसमध्ये उतरले आहेत. त्यामुळे ते हातात छडी घेउन त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांवर कसे अंकुश ठेवणार हा यक्ष प्रश्न आहे. आगामी काळात पुणेकरच हातात छडी घेतील. या भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार करतील असा टोला विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी लगावला आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकBJPभाजपाcongressकाँग्रेस